– कोच अटेडंटने दिला प्रामाणिकतेचा परिचय
नागपूर :-मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या दुरांतो एक्सप्रेसमध्ये पैशाने भरलेली बॅग मिळाली. गाडीतील कोच अटेडंटने प्रामाणिकतेचा परिचय देत ती बॅग आरपीएफ ठाण्यात जमा केली. तसेच दुसर्या कोचमध्ये मिळालेला मोबाईलही संबधित प्रवाशाला परत केला. या दोन्ही घटना मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसमध्ये गुरूवारी सकाळी घडल्या.
मिळालेल्या माहिती नुसार मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेसमध्ये विजय चौरसिया, अर्जुन चाचेडकर व मयुर नंदेश्वर कोच अटेडंट म्हणून काम करतात. गुरूवार सकाळी दुरांतो एक्सप्रेस निर्धारीत वेळेत नागपुरात पोहोचली. घरी जाण्याच्या घाई असल्याने पटापट प्रवासी निघाले आणि काही वेळातच गाडी रिकामी झाली. घरी जाण्याच्या धावपळीत एका प्रवाशाची बॅग तर दुसर्या प्रवाशाचा मोबाईल बर्थवरच राहील.
दरम्यान कोच अटेडंट बोगीत असताना बी-8 मध्ये एक बॅग आढळली. बॅग उघडली असता त्यात 25 हजार रुपये मिळून आले. या घटनेची माहिती त्यांनी आरपीएफला दिली तसेच बॅग त्यांच्या स्वाधीन केली. त्याच प्रमाणे बी-11 बोगीत मिळालेल्या मोबाईलवरून शेवटच्या नंबरवर कॉल करून संबधित प्रवाशाला परत केला.