संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपुर :- ९७ वर्षा पासुन आंबेडकर चळवळीत समग्र आदोलनात अग्रगण्य सरंक्षण कवच म्हणुन व विषमतावाध्यांच्या मनात भीतीनिर्माण करणार एकमेव स्वयंसेवक संघटन म्हणुन कर्तव्य तत्पर राहुन सेवा देनारे समता सैनिक दल या संघटनेची वर्तमान विषम काळात समाजातील तळागाळातिल मानुस मानुष्कीने जगावा या साठी ,समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय अधिकार व लोकतंत्रात्मक भारतीय सविधान सुरक्षित राहाव तथागत बुद्धाचा विश्र धंम्म भारत देशातील पर्वत शिखर लेण्या स्तुप चैत्य संस्थागार व जनसामान्य लोकाच्या मनामनात कोरलेला आहे आज विषमतावाद्याकडून छिन्नभीछिन्न करण्याच्या मनसुभ्यावर प्रहार करण्या साठी गावागावात प्राताप्रातात घर तेथे सैनिक गाव तेथे शाखा निर्माण करुन आदर्श संघटीत समाज निर्माण करण्याच्या वाटचालीत अतुलनीय योगदान प्रदान करून नव्या जोमाने पुढे यावे असे आवहान भदंन्त नाग दिपांकर महास्थविर यांनी केले
समता सैनिक दल ९७ व्या वर्धापन दिन निमित्त दींक्षाभूमीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला उपरोक्त कार्यक्रमास उदघाटक म्हणुन पुज्य भदंत नाग दिपंकर महास्थविर बोलत होते उपरोक्त कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रदिप एस डोंगरे, प्रमुख उपस्थितीत विलास गजघाटे, अमर दिपकर, राजकुमार वंजारी, प्रमोद खांडेकर सरिता ताई लाडे, ईदुताई थुल, सारिका धारगावे संघप्रिय नाग, सि टी मेश्राम, पृथ्वी मोटघरे सुनिता ढवळे प्रतिभाताई खेडकर सुशील कळमकर, युवराज बडगे, मोठ्या संख्येत सैनिक अधिकारी कमाण्डर गणवेशात उपस्थित होते ,नागपुर शहराबाहेरील शाखा मध्ये समता सैनिक दल ध्वज ध्वजारोहण करून संचलन मार्च काढून कार्यक्रम घेण्यात आले.