आदर्श आचारसंहीतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी संदीप बोरकर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर कामठी विधानसभा मतदार संघात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.रामटेक लोकसभा निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात होणार असून 20 मार्च पासून नामनिर्देशन पत्र घेणे /स्वीकारणे सुरू होणार आहे तेव्हा प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, कामठी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनार्थ कामठी विधानसभा चे आदर्श आचारसंहिता चे नोडल अधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.

19 एप्रिल 2024 रोजा होणाऱ्या रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा सज्ज निवडणूक विभाग पूर्णपणे सज्ज आहे.रामटेक लोकसभा मतदार संघ अंतर्गत सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे ज्यामध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड,कामठी व रामटेक चा समावेश आहे हे सहाही विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार संख्या ही 20 लक्ष 46 हजार 435 आहे त्यात कामठी विधानसभा मतदार संघात 4 लक्ष 65 हजार 399 मतदारांचा समावेश आहे.त्यात 2 लक्ष 35 हजार 71 पुरुष,2 लक्ष 30 हजार 313 स्त्री मतदार तर 15 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.कामठी विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्राची संख्या 508 आहे .85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार तसेच 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मतदारास 12 डी नमुना परिपूर्ण भरून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

कामठी नगर परिषद सभागृहात आदर्श आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रार निवारण /मदत कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1950 आहे तसेच सी व्हिजिल या एप वरही तक्रार नोंदविता येणार आहे.नियमानुसार उमेदवार व पक्षांना प्रचार कार्यक्रमासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

Tue Mar 19 , 2024
गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर आज पूर्ण करण्यात आली. यातून कोणते ईव्हीएम मशिन कोणत्या मतदारसंघात जाणार, हे निश्‍चित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com