चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त महापालिका मुख्यालय येथे शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस उपायुक्त अशोक गराटे, लेखाधिकारी मनोहर बागडे,सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या शुभहस्ते यांच्या उपस्थितीत पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिकानी ब्रिटीशांविरुद्ध दिलेल्या लढ्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या बलिदानामुळेच आपण देशात विकास करू शकलो,भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या कार्यामुळेच भारताचा स्वातंत्र्य लढ्याची माहीती जगभरात पसरली. आज २३ मार्च रोजी सर्वांनी केलेल्या प्रयत्नास नमन असल्याचे प्रतिपादन उपायुक्त अशोक गराटे यांनी केले.
याप्रसंगी डॉ. नरेंद्र जनबंधु, विकास दानव, प्रदीप पाटील,संघमित्रा पुणेकर, शारदा भुक्या, ज्योती व्यवहारे तसेच आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थीत होते