नागपूर :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्य विक्री प्रक्रियेला दिनांक 22 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
साहित्याची विक्री लिलाव पद्धतीने होणार असून www.eauction.gov.in या संकेतस्थळावर 13 एप्रिल,2023 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदर प्रक्रियेला 22 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. लिलावा संबंधीचे संपूर्ण वेळापत्रक, अटी व शर्ती, इत्यादी माहिती वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र लिलावधारकांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा असे आवाहन व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक पी.टी. देवतळे यांनी केले आहे.