संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे वाजताहेत तीनतेरा
कामठी :- आरोग्य विभागात मानाचे पद असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे वाऱ्यावर आले असून शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला पडत असलेल्या अपुऱ्या जागेच्या कारणावरून मागील कित्येक वर्षांपासून शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरात कार्यरत असलेले तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे रिक्त करून नाईलाजास्तव पंचायत समितीच्या जीर्ण अवस्थेत असलेल्या खोलीत स्थलांतर करावे लागले इतकेच नव्हे तर आदर्श घरकुल असलेले डेमो हाऊस चा सुद्धा वापर करण्यात येत आहे.तेव्हा तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात अति महत्वाचे असलेले कार्यालय हे स्वतःच्या इमारतीत कार्यरत आहेत मात्र तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे अजूनही स्वमालकीच्या इमारती विना असल्याने या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे वाजताहेत तीनतेरा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सन 2007 पासून कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरात कार्यरत असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातुन तालुका अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात वर्षभर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना अधिक चालना मिळून त्यांच्यावर देखरेख करण्याचे कार्य येथील तालुका आरोग्य अधिकारीच्या कार्यालय मार्फत करण्यात येत आहे.या कार्यालयात सद्यस्थितीत एक प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी , डेपोटेशन असलेले एक लिपिक,एक आरोग्य सहाय्यक,एक आरोग्य सेवक,एक कृष्ठरोग तंत्रज्ञ ,एक टी बी तंत्रज्ञ,एक लेखापाल,एक प्रोग्रॅम असिस्टंट, एक तालुका समनव्य संघटक, एक परिचक कार्यरत आहेत.या कार्यालयातुन तालुक्याचा आरोग्य कारभार सांभाळण्यात येतो तर शासकीय उपजिल्हा रुग्णालय अधिनस्थ सुरू असलेले ए आर टी सेंटर इमारत ही मोडकळीस आली असून मोठा अपघात होऊन आशिलांना व कर्मचाऱ्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी कार्यरत असलेले तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे इतरत्र पंचायत समिती ला हलविण्यात यावे असे आदेशीत पत्र जिल्हा शल्य चिकित्सक ने 12 सप्टेंबर 2022 ला वैद्यकीय अधीक्षक कामठी ला दिल्यानुसार सदर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे भुगावला हलविण्यात यावे असे विचाराधीन होते मात्र सदर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे कामठी शहरातच असणे आवश्यक आहे कारण तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात मुख्य कार्यालय हे या शहरातच आहेत आणि 2007 पासून हे कार्यालय इथेच कार्यरत होते त्यामुळे झालेल्या प्रशासकीय समन्वय बैठकीतून सदर चे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे नुकतेच कामठी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या गाळ्यात स्थलांतरित करण्यात आले.मात्र या गाळ्याची दुरावस्था असूनही कसेबसे कार्यालय स्थलांतर करण्यात आले.कशीबशी भिंतीची रंगरंगोटी करण्यात आले मात्र या कार्यलयात असलेले गाळ्याच्या दुरावस्थेत शौचालय , बाथरूम ला दारे नाही आदी दुरावस्थेचा समावेश आहे.अशा बिकट स्थितीत हे कार्यालय सुरू आहे.तर या कार्यालयाला पडत असलेली अपुरी जागा लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजना चे आदर्श घरकुल असलेले डेमो हाऊस सुदधा उपयोगात आणल्या जात आहे.तसेच महत्वपूर्ण असलेले कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे अजूनही स्वाईमारती विना आहे याची शोकांतिका वाटते.तर या पडक्या इमारतीतून तालुका आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे.तालुका आरोग्य विभागाच्या अशा अनेक अडचणी असल्याचे समोर आले आहे.तेव्हा राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कामठी तालुका आरोग्य विभागाच्या या प्रकाराकडे लक्ष पुरवावे अशी मागणी जोर धरत आहे.