नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील पश्चिम भारतस्तरीय शरीर सौष्टव स्पर्धेत महाराष्ट्राचा सागर कातुर्डे ‘खासदार श्री 2024’ चा मानकरी ठरला. तर महाराष्ट्राच्या हरमित सिंग ला ‘बेस्ट पोजर’ म्हणून गौरविण्यात आले.
रविवारी (ता.21) रात्री फुटाळा तलाव परिसरात झालेल्या स्पर्धेत सागर कातुर्डेने 85 किलो वजनगटात उत्कृष्ट प्रदर्शन केले. या वजनगटात विदर्भाचा आशिष काळसर्पे उपविजेता ठरला. विदर्भाचाच मोहम्मद तनवीर तिसरा तर विक्की लांडगे चवथ्या स्थानावर राहिला.
85 किलोवरील वजनगटामध्ये महाराष्ट्राच्या हरमित सिंगने बाजी मारली. विदर्भाचा आकाश राजपूत उपविजेता तर निलेश जोगी आणि प्रणय साखरे यांनी तिसरे व चवथे स्थान पटकावले.
दिव्यांग गटात मध्यप्रदेशच्या सुरेश दासरीने पहिले स्थान प्राप्त केले. महाराष्ट्राचा अश्वन कुमार सोनवाने दुसरा तर विदर्भाचा प्रशिक थुलेकर तिसरा आला. जितेंद्र नाईड (महाराष्ट्र) आणि मंदार मुरमारे (विदर्भ) यांनी चवथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मास्टर्स गटात छत्तीसगढच्या कोईम्बाने बाजी मारली. मध्यप्रदेशच्या चिराग पाटील ने दुसरे तर गुजरातच्या सतिश पुजारी ने तिसरे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्रचे लिलाधर म्हात्रे आणि अमन भोईर चवथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले.
निकाल (प्रथम पाच)
55 किलो वजनगट
संजय भोपी, गितेश मोरे, अक्षय गवाने, ओंकार आगरे, हनुमान भगत (सर्व महाराष्ट्र)
60 किलो
गणेश पाटील (महाराष्ट्र), अरुण दास (मुंबई – नेव्ही), मयुर म्हात्रे (गोवा), दत्तात्रय सावरकर् जमाल अंसारी (दोघे विदर्भ)
65 किलो
शेख सलीम (विदर्भ), माजिद बागवान (महाराष्ट्र), पंकज मडके , जय नवघरे, सैय्यद खुर्रैम (तिघेही विदर्भ)
70 किलो
उमेश गुप्ता, संकेत भरम (दोघे महाराष्ट्र), उमेश पांचाळ (गोवा), रवींद्र माने (मुंबई – नेव्ही), उदय धुमाळ (मध्यप्रदेश)
75 किलो
उदय देवरे (महाराष्ट्र), योगेश शेंडे (विदर्भ), संतोष भटनकर, स्वप्निल अथाईत, विशाल धावडे (तिघेही महाराष्ट्र)
80 किलो
विशाल सिन्हा, अक्षय खोत, अमित साटम, सौरभ म्हात्रे (सर्व महाराष्ट्र), उमेश भाकरे (विदर्भ)
85 किलो
सागर कातुर्डे (महाराष्ट्र), आशिष काळसर्पे, मोहम्मद तनवीर, विक्की लांडगे (सर्व विदर्भ)
85 किलोवरील वजनगट
हरमित सिंग (महाराष्ट्र), आकाश राजपूत, निलेश जोगी, प्रणय साखरे (सर्व विदर्भ)
खासदार श्री 2024 – सागर कातुर्डे (महाराष्ट्र)
बेस्ट पोजर – हरमित सिंग (महाराष्ट्र)
दिव्यांग : खुला गट
सुरेश दासरी (मध्यप्रदेश), अश्वन कुमार सोनवाने (महाराष्ट्र), प्रशिक थुलेकर (विदर्भ), जितेंद्र नाईड (महाराष्ट्र), मंदार मुरमारे (विदर्भ)
मास्टर्स : खुला गट
कोईम्बा (छत्तीसगढ), चिराग पाटील (मध्यप्रदेश), सतिश पुजारी (गुजरात), लिलाधर म्हात्रे, अमन भोईर (दोघे महाराष्ट्र)