राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना

मुंबई :- अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारोहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली.

राज्यपाल बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला.

राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी या मंदिराला भेट दिली होती.

साकळाई देवी व सागरमाता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवी मंदिर परिसरातच श्रीराम पंचायतन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

राजभवन देवी मंदिर समितीतर्फे यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांचा सत्कार करण्यात आला.

श्री राम पंचायतन स्थापना विधीला राज्यपाल बैस यांचे कुटुंबिय तसेच राजभवन संकुलातील निवासी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांनी मंदिर निर्माण कार्य करणाऱ्या श्रमिकांची भेट घेतली तसेच मंदिराची योग्य देखभाल ठेवल्याबद्दल राजभवन देवी मंदिर सदस्यांना कौतुकाची थाप दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Jai Shree Ram…

Tue Jan 23 , 2024
On the onset let me begin by wishing you and everyone Jai Shri Ram! What a moment for all of us to witness!! Just splendid. To see something which has not been done in the last 500 years, it truly was magical and once in a lifetime of an opportunity. Thank You PM Modi and the blessings of entire generations […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com