लवकरात लवकर एस. टी बस सुरू करण्यात यावी ..
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे एस.डी.ओ वंदना सवरंगपते यांचे मार्फत मुख्य मंत्र्यांना निवेदन……
रामटेक :- मकरसंक्रांति पासून एसटी महामंडळाचे निवडक शहरात आणि मार्गावर एसटीची वाहतूक सुरू केली आहे ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू झालेली नसल्यामुळे उपलब्ध खाजगी वाहनातून ये _जा करीत आहे. गट महिनाभरात एसटी बसेसच्या संख्येत आणि फेऱ्यांमध्ये फारशी वाढ झाली आहे.मार्गावर अनेक प्रकारची वाहने उपलब्ध आहे मात्र ग्रामीण भागात येणे, जाणे करण्यासाठी वाहतुकीचे कोणतेही निश्चित साधन मिळेल याबाबत खात्री नाही टॅक्सी व्हेन खाजगी ट्रॅव्हल्स बसेसह किंवा जो मिळेल त्या वाहनातून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही… करीता लवकरात लवकर संपाचा तोडगा काढून बस सुरू करण्यात यावी… अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक तर्फे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे….
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेकच्या अध्यक्ष शितल चिंचोळकर , उपाध्यक्ष जयश्री मर्जीवे, संघटन मंत्री ज्ञानेश्वरी चव्हाण , सचिव आचल लबडे विधी सल्लागार प्रमुख ॲड जयश्री मेंघरे सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
मागील तीन महिन्यापासून एस. टी कमरचाऱ्यांचे संप सुरू आहे. यातच शासनाने शाळा महाविद्यालये सुरू केली.
एस. टी बस सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे . पूर्वीप्रमाणे एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. खाजगी वाहनचालक अतिरिक्त शुल्क घेऊनच वाहतूक करीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाचे सुद्धा मोठे नुकसान होत आहे. जोपर्यंत संपाच्या तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत महामंडळ सोबतच विद्यार्थ्यांचे सुद्धा नुकसान होणार आहे.एकीकडे विलीनिकरण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहे तरी दुसरीकडे शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. 3 महिन्यापासून संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. यात एसटीच्या वाहतूक पूर्णत बंद असल्याने खासगी वाहतूकदारांची मनमानी वाढली आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजून शाळेच्या प्रवास करावी लागत आहे.शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला संपाचा तोडगा अद्याप काढलेला नाही त्यामुळे एसटी ऐवजी खाजगी वाहनातून शाळेपर्यंत जावे लागत आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थी एसटिने प्रवास करीत असतात.
वाहतुकीची सोय नसल्यामुळे एक तर खाजगी वाहनातून शाळेपर्यंत जा अन्यथा घरीच बसा अशी व्यवस्था शाळेकरी विद्यार्थ्यांची झाली आहे. याचा फटका शाळेतील उपस्थिती वर दिसून येत आहे. जवळपास 75 टक्के विद्यार्थी एसटीतून प्रवास करीत असतात त्यामुळे 25 ते 30 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती लागत आहे.सध्याच्या घडीला मुख्य मार्गावर एसटीची वाहतूक होत आहे पूर्वीप्रमाणे एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. खाजगी वाहनचालक अतिरिक्त शुल्क घेऊनच वाहून वाहतूक करीत आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाचे सुद्धा मोठे नुकसान होत आहे जोपर्यंत संपाच्या तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत महामंडळ सोबतच विद्यार्थ्यांचे सुद्धा नुकसान होणार असल्याने लाल परी त्वरित सुरू करावी अशी मागणी सर्वत्र जोर पकडत आहे.