– आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने १७८३५ शेतकऱ्यांना दिलासा !
– आमदार देवेंद्र भुयार यांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार !
मोर्शी :- मोर्शी वरूड तालुक्यामध्ये जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत मोर्शी वरूड तालुक्यामध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते गारपिटीमुळे संत्रा शेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यतील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता तेव्हा आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
आमदार देवेंद्र भुयार यांनी जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या शेती पिकांचे फळ बागांच्या झालेल्या नुकसानीची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबतचा आढावा बैठक घेऊन शेतकरी बांधवांच्या या मागणीकडे विशेष लक्ष घालून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची गळ घातली असता मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव यांना तात्काळ कार्यवाही बाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यासाठी ६०४१ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी २१ कोटी ७४ रुपये, कापूस सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त ३५६० शेतकऱ्यांना २ कोटी १ लक्ष रुपये, वरूड तालुक्यातील ८२३४ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना २९ कोटी ६४ लक्ष रुपये, मंजूर करण्यात आले असून मोर्शी वरूड तालुक्यातील १७ हजार ८३५ शेतकऱ्यांना ५३ कोटी ३९ लक्ष रुपये नुकसान भरपाई मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ५३ कोटी ३९ लक्ष रुपयांची मदत उपलब्ध करून शेतकऱ्यांना आधार दिला आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत फक्त ३ महिन्यामध्ये तात्काळ मंजूर करून दिली यामध्ये मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे १२९५५.५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ कोटी ७५ लक्ष रुपये, तसेच वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ८०१७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना २९ कोटी ६४ लक्ष रुपये मदत आमदार देवेंद्र भुयार यांच्या अथक परिश्रमामुळे प्राप्त झाले असून मोर्शी तालुक्याला आवश्यक असलेली संपूर्ण रक्कम उपलब्ध करून दिली त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले असून मोर्शी वरूड तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार असल्याचे यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगीतले.