लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामठी पोलिसांचा रुट मार्च

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन पोलिस ठाणे, सीमा सुरक्षा दल व होमगार्ड आगामी 19 एप्रिल ला होऊ घातलेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त निकेतन कदम तसेच एसीपी , नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मुख्य उपस्थितीत स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन येथून आज 2 एप्रिल ला सायंकाळी साडे सात वाजता सीमा सुरक्षा दल, पोलीस वर्ग तसेच होमगार्ड यांनी रुट मार्च काढला.

याप्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन कामठी व जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने संचलन झाले. हा रूट मार्च नवीन कामठी पोलीस स्टेशन येथून काढत पोलीस स्टेशन हद्दीतील मुख्य मार्गाने काढत पोलीस ठाणे जुनी कामठी येथून गुरुनानक चौक – दुर्गा मंच मोंडा, माहुरे हॉस्पिटल – न्यू खलाशी लाईन – कमला नेहरु स्कूल – राम मंदिर – ते दर्जी मोहल्ला – नेताजी चौक – गुड ओळी चौक – सिंघानिया चौक – जामा मस्जिद – गुजरी बाजार – मकसुद हॉटेल चौक – शालीकराम देविदिन शाळा – गोयल चौक – गांधी चौक – सतू हलवाई चौक – चावडी चौक –  या मार्गावर रुट मार्च काढला व नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे रूट मार्च चे समापण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आझाद नगर येथे 33 हजार 500 रुपयांची घरफोडी

Wed Apr 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आझाद नगर येथील कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्यानी घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातल्या आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 25 हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण 33 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी कपडा व्यापारी शेख सलाम शेख युसूफ ने पोलीस स्टेशन ला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights