दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. ४४, अलिशान नगर, जिजामाता नगर, वाठोडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आरीफ इनायतखान पठान, वय २८ वर्षे, हे गुन्‌ह्यामध्ये मध्यवर्ती कारागृह येथे दाखल असतांना तेथे त्यांची ओळखी झालेले आरोपी क. १) कुणाल सुरेश हेमने, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १९४, आझाद नगर, विडगांव, २) विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता, वय २२ वर्षे, रा. प्लॉट नं. १४९, आवण नगर, वाठोडा ३) सुजीत भाऊराव घरडे, वय २३ वर्षे, रा. रामनगरी, वाठोडा, ४) कुलदिपसिंग लखनसिंग बावरी, वय २९ वर्षे, रा. वार्ड नं. २, खौरी पोलीस चौकीमागे, बु‌ट्टीबोरी, नागपूर पाहीजे आरोपी ५) अफसर उर्फ अंडा, वय ४५ वर्षे, रा. गि‌ट्टीखदान यांनी फिर्यादीचे घराजवळील जिजामाता नगर, चारडिपी जवळ येवुन फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन “तुला ऋपी खोसला याच्या मर्डरच्या सुपारीचे पैसे भेटले आहे, त्यामधील दहा हजार रूपये आम्हाला दे” असे म्हणुन, १०,०००/-रू, जबरीने हिसकावुन घेतले. तसेच, फिर्यादीचे पत्नी व वडीलांना शिवीगाळ करून धमकी दिली, फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३१०(२), ३५२, ३५१(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा नोंदविला होता. वाठोडा पोलीसांनी गुन्‌ह्याचे तपासात मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून हिंगणा परीसरात सापळा रचुन हयुंदाई कंपनीची कार क. एम. एच. ०२, सि.एल. ९२६७ मधील, आरोपी क. १ ते ४ यांना ताब्यात घेतले. आरोपींचे ताब्यातुन ह्युंदाई कंपनीची कार, ०२ पिस्टल, ०१ रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुस व ०२ लोखंडी चाकु असा मुद्देमाल मिळुन आल्याने, एकुण किंमती अंदाजे २,५०,०००/-रू, चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना वर नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पाहिजे आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर,  शिवाजीराव राठोड, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभाग) नागपूर शहर, रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त (परी. क. ०४),  विनायक कोते, सहा. पोलीस आयुक्त (सक्करदरा विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. हरीषकुमार बोराडे, पोउपनि, माधव गुंडेकर, अमोल पाटील, सचिन ठाकरे, कृष्णा साळोके, स्वप्नील राऊत, सागर गायकवाड, पोहवा. अश्वीन बडगे, नापोअं. सुनिल वानखेडे, कैलाश चकोले, पोओ. प्रफुल्ल वाघमारे, जितेंद्र मनगटे, मिलींद ठाकरे, राजेश सरकटे, आशिष बति, कैलाश श्रावणकर, हिमांशु पाटील व कुणाल उके यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गंभीर अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Wed Oct 16 , 2024
  नागपूर :- फिर्यादी नामे निर्मला दिपनारायण चतुर्वेदी, वय ५० वर्षे, रा. श्रीकृष्णधाम, सेक्टर नं. ६, वॉक्स कुलर मागे, कोराडी रोड, मानकापुर, नागपुर ह्या ऑटो क. एम. एच. ४९ ए.आर. ६३४७ ने त्यांचे परी जात असता, पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत मानकापुर ओव्हर ब्रिजवर ऑटो क. एम.एच. ३१ एफ.वि. ०८७६ ये चालकाने त्याचे ताब्यातील ऑटो भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com