नागपूर : नागपूर-रामटेक रोडवर कांद्री माईन जवळ रोड अपघातामध्ये बिबट शावकाचा मृत्यू झाला आहे. मृतक बिबट मादी 5-6 महिने वयाचे असून मृत्यू हा चारचाकी वाहन बिबटच्या डोक्यावरुन गेले असल्याचे प्राथमिक निरिक्षण व शवविच्छेदन अहवालानुसार निदर्शनास आहे. बिबट शावकावर ट्राझिंट ट्रिमेंट सेंटर परिसरामध्ये अत्यंविधी करण्यात आला.
यासंदर्भात वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक वनसंरक्षक संदिप गिरी, रामटेक उपविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे, वनपाल गजानन शेटे, वनरक्षक कु. राठोड, श्री. सोडगीर, श्री. शिंदे व श्री. विभुते यांनी पार पाडली. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकारणाच्या (NTCA) आधारभूत मानक प्रणालीनुसार पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक संदिप गिरी करीत आहे.