नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) तरोडी (बु) येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील कामांचा आढावा घेतला. आढावा बैठकीमध्ये ना. गडकरी यांनी नागरिकांना पायाभूत सोयीसुविधांची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, माजी नगरसेवक भास्कर पराते आदींची उपस्थिती होती. यावेळी तरोडी (बु) येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या घरांना पाणी, वीज, रस्ते यासारख्या सोयीसुविधांमध्ये कुठल्या अडचणी येत आहेत, याची माहिती ना. गडकरी यांनी घेतली. तसेच लवकरात लवकर अडचणींवर मात करण्याच्या सूचना केल्या. या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक कामाची पाहणी करावी, असेही निर्देश ना. गडकरी यांनी दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com