संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
बीपीएल प्रमाणपत्राची अट रद्द करण्याची मागणी
कामठी ता प्र 27 :- केंद्र शासनातर्फे अनेक जनकल्यानकारी योजना राबविल्या जात आहेत .त्या योजनांचा लाभसुद्धा नागरिकांना मिळत आहे परंतु काही योजनामध्ये शसनाचे निकष सर्वसामान्यावर अन्याय करणारे असल्यामुळे त्या योजनांचा लाभ मात्र गरजू व्यक्तीला मिळत नाही .दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वय 18 ते 59 वर्षे वयोगटातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या पत्नीला शासनाच्या कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून 20 हजार रुपयांची अनुदान देऊन सांत्वना केली जाते तसेच दर महिन्याला 1000 रुपयांचे शासकीय अर्थसहाय्य सुद्धा केले जाते मात्र या योजनेतील कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभ घेण्यासाठी शासनाने घालून दिलेली बीपीएल प्रमाणपत्राची अट ही कित्येक लाभार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेला लाभार्थी हे दारिद्र्यरेषेखाली मोडतो बरं मात्र संबंधित विभागाकडून मिळणाऱ्या यादीत नाव नसल्याच्या नावाखाली बीपीएल प्रमाणपत्र देण्यात येत नाही , परिणामी दारिद्र्य रेषेखालील जीवन व्यतीत करणाऱ्या लाभार्थ्याला बीपीएल प्रमानपत्रा अभावी कुटुंब अर्थसहाय्य योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याने शासनाने कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी लागू केलेली बीपीएल प्रमाणपत्राची अट रद्द करावी या मागणीसाठी माजी नगरसेवक व कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांनी नायब तहसीलदार आर उके यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बीपीएल शिधापत्रिका धारकांचा विचार केल्यास आता बीपीएल ची व्याख्याच ही संपुष्टात आली असून अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली असून प्राधान्य, अंत्योदय, केशरी, शुभ्र असे शिधापत्रिका धारक ठरविण्यात आले मात्र आता बीपीएल शिधापत्रिका धारक अशी ओळख आता राहलेली नाही. दारिद्र्य रेषेखाली जीवणयापन करणाऱ्या खऱ्या लाभार्थ्याला कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ बीपीएल प्रमानपत्राची अट असल्याने केंद्र व राज्य शासनाने विविध योजनेतून वगळलेली बीपीएल ची अट ही कुटुंब अर्थसहाय्य योजनेला अपवाद ठरली आहे.
मागील काही वर्षांपूर्वी शहरात झालेल्या सर्वेक्षणात बीपीएल धारकाची यादी तयार करण्यात आली होती मध्यंतरी नगर परिषद कामठी च्या अधिनस्थ असलेल्या या कार्यालयात लागलेल्या अकस्मात आगीत जळलेल्या काही कागदपत्रात राखभस्म झालेल्या स्थितीत काही बीपीएल धारक कुटुंबांची नावे सुदधा आगीत भस्म झाले परिणामी आजच्या स्थितीत त्यांची नावे बीपीएल यादीत दिसून येत नाही नाईलाजास्तव या बीपीएल धारक कुटुंबातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यास या कुटुंबातील लाभार्थी बीपीएल प्रमानपत्रा अभावी कुटुंब अर्थसहाय्य योजनेपासून वंचित रहात आहे तेव्हा शासनाने कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी बीपीएल प्रमाणपत्राची अट रद्द करावी अशी मागणी नायब तहसीलदार आर उके यांना दिलेल्या निवेदनातून नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी केले आहे.