संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लुंबिनी नगरातील एका कुलूपबंद घरात अवैधरित्या प्रवेश करून घरात सुरक्षित ठेवलेले नगदी 5 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 44हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना काल सायंकाळी पाच दरम्यान निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी अश्विन गवई वय 31 वर्षे रा लुम्बिनी नगर कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 380, 454, 457 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हा वाहनचालक पदावर कार्यरत असून 27 मे ला बिलासपूर ला कामानिमित्त गेले होते .परत आल्यानंतर घरफोडी झालेल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा कुलुपकोंडा तुटून पडलेला असून घरातील नगदी रुपये व मौल्यवान साहित्य चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यावरून पोलिस स्टेशन ला तक्रार नोंदविली. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.