वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण व सामुहिक शेततळे या घटकाच्या प्लास्टीक फिल्म वितरक व विक्रेतांची नोंदणी

15 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

नागपूर :- कृषी विभागाच्या योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण व सामुहिक शेततळे या घटकाच्या प्लास्टीक फिल्मचा (रीइनफोर्सड एचडीपीई जीओ मेंबरेनफिल्म IS:15351:2015 Type ) पुरवठा करणा-या वितरक व विक्रेता यांची नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर कार्यालयाकडे करावयाची आहे. ज्या उत्पादक कंपन्या महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडे राज्यस्तरीय नोंदणीकरीता पात्र असतील अशा कंपन्याचे वितरक किंवा विक्रेता जिल्हास्तरावरील नोंदणीस पात्र राहतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

एका वितरकास जास्तीत जास्त तीन उत्पादक कंपन्यांचे वितरण म्हणुन नोंदणी करता येईल. याकरिता कृषि आयुक्तालयाने निर्गमित केलेल्या वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण व सामुहिक शेततळे या घटकाच्या मार्गदर्शक सुचनातील तांत्रिक निकष 15:15351:2015 नुसार साहित्य पुरवठा करणे व कामे करणे बंधनकारक राहील. तसेच या कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्गमित होणारे परिपत्रक, आदेश, शुध्दीपत्रक, सुधारित सूचनांचा अवलंब करणे अनिवार्य राहील.

जे नोंदणीकृत उत्पादक कंपन्या वितरक नेमणूक न करता कंपनीच्या देयकावर थेट शेतक-यांना विक्री व्यवहार करतील त्यांनी विभागासाठी निश्चित केलेल्या त्यांच्या विक्री पश्चात सेवा केंद्राच्या ठिकाणी वितरक व विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. नोंदणी ज्या जिल्हयात विक्री पश्चात सेवा केंद्र असेल त्या जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडे करावी लागेल.

ज्या नोंदणीकृत उत्पादक कंपन्यांना जिल्हयात वितरक नेमणूक करुन व्यवसाय करावयाचा आहे, अशा कंपन्यामार्फत नेमलेल्या वितरकांनी त्या जिल्हयाच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे वितरक नोंदणी करावी लागेल.

वितरक व विक्रेता नोंदणी प्रक्रिया दिनांक 1 ते 15 डिसेंबर या विहित मुदतीत होणार आहे. अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सिव्हील लाईन नागपूर या कार्यालयास सादर करावे. अधिकची माहिती व अटी शर्ती, अर्जाचा नमुना, नोंदणी करीता लागणारे आवश्यक कागदपत्रे आदी माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांचा आधार - सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित

Wed Dec 7 , 2022
गडचिरोली :- संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे. सखी वन स्टॉप सेंटर या नावाने प्रसिद्ध असलेली ही योजना 1 एप्रिल 2015 पासुन लागू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या निकषानुसार शारीरीक, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com