संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
एका आरोपीस अटक, 3 लक्ष 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव मार्गावरून अवैधरीत्या कोळसा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच एसीपी कार्यालय पोलीस कर्मचारी व नविन कामठी पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून लिहिगाव बोगदयाजवळ पिकअप क्र एम एच 40 सी डी 5388 वर धाड घालून त्यातील दीड टन अवैध कोळसा जप्त केल्याची यशस्वी कारवाही सकाळी 5 दरम्यान केली असून या धाडीतुन दीड टन अवैध कोळसा किमती 6900 रुपये व जप्त पिकअप वाहन किमती अडीच लक्ष असा एकूण 3 लक्ष 19 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी प्रविण उमरे वय 40 वर्षे रा जुनी कामठी कन्हान विरुद्ध गुन्हा नोंदवित आरोपीस अटक करण्यात आले.