नागपूर :- इयता 10वी व 12वी च्या परिक्षेसाठी नोंदणीअर्ज सादर करण्याची नियमित मुदत संपल्यानंतर परिक्षार्थ्यांना विलंबशुल्कासह नोंदणी करता येणार आहे. इयता 10वीच्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेमार्फत ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करण्याची मुदत नियमित शुल्कासह 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत तसेच विलंब शुल्कासह दिनांक 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2023 पर्यंत राहणार आहे. तर इयत्ता 12वी च्या परिक्षेचे नोंदणीअर्ज विलंब शुल्कासह भरण्याची मुदत 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 अशी राहणार असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.