नागपूर :- भिवापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय शिल्प निदेशकाचे फळे भाज्या संस्करण एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार असून त्यासाठी शासकीय दराने मानधन देण्यात येणार आहे.
व्यवसाय शिल्प निदेशकासाठी संबंधित व्यवसायातील द्वितीय श्रेणीमध्ये पदविका उत्तीर्ण असल्यास अनुभवाची आवश्यकता नाही. संबंधित व्यवसायातील नॅशनल अप्रेटिस सर्टिफिकेट किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्राचे एस.सी.व्ही.टी. सर्टिफिकेट असल्यास प्रशिक्षणासह चार वर्षाचा संबंधित व्यवसायातील प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे. डिफेंस सर्विस मधील बेसिक अर्हता असल्यास दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
उच्च शैक्षणिक अर्हताधारक उमेदवार पात्र असून सिटीआय येथील ट्रेनिग पूर्ण केले असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अनुभवाची पुर्तता करणारे उमेदवार प्राप्त होत नसल्यास अनुभवाची अट शिथिल करण्यात येईल. रिक्त पदाच्या संख्येत बदल होऊ शकते. उपस्थित उमेदवारांची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा घेवून निवड करण्यात येईल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिवापूर येथे सर्व मूळ प्रमाणपत्र व एक झेराक्स प्रतीसह सोमवार 20 डिसेंबरला सकाळी 12 वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सी. एस. राउत यांनी केले आहे.