कामठी विधानसभा मतदार संघातील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 20:-केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांनी कामठी तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमची सखोल पाहणी करून संबंधित नोडल अधिकारी , सहकारी अधिकारी यांच्याशी वार्तालाप करून कामठी विधानसभा मतदार संघातील लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा पूर्वतयारीचा आढावा घेतला.आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.तसेच मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांना भेट देऊन मतदानाची टक्केवारीब वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या.

याप्रसंगी तहसिलदार गणेश जगदाडे, आदर्श आचार संहिता नोडल अधिकारी संदीप बोरकर, नायब तहसीलदार राजाराम बमनोटे,नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ - नागपूर विभागात एक नामनिर्देशनपत्र दाखल

Wed Mar 20 , 2024
नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यासाठी आज नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. विभागातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com