नागपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुही या संस्थेत व्यवसाय शिल्प निदेशक गणित व चित्रकला एक पद सेवींग टेक्नालॉजी एक पद, सर्व्हेअर एक पद, कारपेंटर एक पद, एम्पलायबिलीटी स्किल एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार असून त्यासाठी शासकीय दराने मानधन देण्यात येणार आहे.
व्यवसाय शिल्पनिदेशकांसाठी संबंधीत व्यवसायातील द्वितीय श्रेणीत पदविका उत्तीर्ण असल्यास अनुभवाची आवश्यकता नाही संबंधीत व्यवसायातील नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट किंवा ट्रेड सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र एस. सि.टी. व्हि. सर्टिफिकेट असल्यास प्रशिक्षण 4 वर्षाचा संबंधीत व्यवसायातील प्रात्याक्षिक अनुभव आवश्यक आहे. डिफेस सर्विस मधील बेसिक अर्हता असल्यास दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
एम्पलायबिलीटी स्किल निदेशकासाठी कोणतीही पदवी किंवा पदविकाधारक व एम्पलायबिलीटी स्किलमधील शार्ट टर्म कोर्स सह दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे व बारावी पदविका तथा वरील पातळीवर इंग्रजी कॅम्युनिकेशन आणि बेसिक कॉम्प्युटरचे शिक्षण झाले असावे.
उच्च शैक्षणिक अर्हताधारक उमेदवार पात्र राहील सिटीआय येथील ट्रेनिंग पूर्ण केले असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अनुभवाची पूर्तता करणारे उमेदवार प्राप्त होत नसल्यास अनुभवाची अट शिथिल करण्यात येईल रिक्त पदाच्या संख्येत बदल उपस्थित उमेदवारांची लेखी प्रात्याक्षिक परिक्षा घेवून निवड करण्यात येईल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुही येथे सर्व मुळ प्रमाणपत्र व एक झेरॉक्स प्रती सह 6 फेब्रुवारीला सकाली 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे कुही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
@ फाईल फोटो