नागपूर :- कमला नेहरू महाविद्यालयामध्ये वाचन लेखन चळवळ” अंतर्गत मनोविकास प्रकाशनाचे संचालक अरविंद पाटकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही वाचन लेखन चळवळ निर्माण करण्यात आली आहे. अरविंद पाटकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि वाचन व लेखनामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात व पुस्तक प्रकाशनाचे व्यवसाय सुरु करावे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी ॲड. आमदार अभिजीत बंजारी यांनी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी होत्या. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी वाचन व लेखनामुळे विद्याथ्र्यांच्या शब्द संग्रहात वाढ होते व त्यांचा सर्वांगीण विकास होतो व त्याची आकलनशक्ती वाढते, असे सांगितले. ग्रंथपाल सुवर्णां इनामदार यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक प्राध्यापक मुग्धा राजनकर यांनी संचालन केले तर सहाय्यक ग्रंथपाल हेमलता दुके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ग्रंथालय कर्मचारी मयूर पडोळे, पिंटू नखाते, देविदास आगाशे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्याथ्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लेखिका अरुणा सबाने यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्याथ्यांना मार्गदर्शन केले.