कामठी तालुक्यात अभ्यासिका व कोचिंग क्लासेसच्या नावावर अवाढव्य शुल्क वसुली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– शहरात खाजगी शिकवणीचा धंदा जोमात

कामठी :- विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन व सराव तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्याच्या नावाखाली कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अभ्यासिका व कोचिंग क्लासेस सुरू आहेत या विद्यार्थाकडून मोठ्या प्रमाणात अवाढव्य शुल्क वसुली केली जात आहे.

कामठी शहर हे खाजगी शिकवणीचे केंद्र बनले आहे. अभ्यासिका व मार्गदर्शन बाजूला सारून केवळ पैसा कमावण्याचे साधन बनले आहे.शालेय विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी तसेच युवा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मार्गदर्शकांचा शोध घेत असतो इयत्ता बारावीनंतर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तर भरकटत असतात तेव्हा त्या अभ्यासिकेत मार्गदर्शन प्राप्तीसाठी जातात परंतु त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वार्षिक शुल्क आकारले जाते याशिवाय सैनिक भरती व अन्य स्पर्धा परिक्षबाबतसुद्धा मार्गदर्शन केले जाते मात्र या अभ्यासिका व कोचिंग क्लासेसकडे कुणाचेही नियंत्रण नसल्याने अवाढव्य शुल्क वसुली करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या - नितीन गडकरी

Sat Nov 18 , 2023
नागपूर :- पारंपारिक शेती सोबत मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत, आधुनिक पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठ सभागृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. बैठकीला वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार,खासदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com