रमानगरच्या जुगार अड्यावर धाड,10 जुगाऱ्यावर गुन्हा दाखल,44 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना गतरात्री 11 वाजता यशप्राप्त झाले असून या धाडीतून 10 जुगाऱ्याना ताब्यात घेत 52 तास पत्ते किमती 30 रुपये , नगदी फक्त 2000 रुपये व पाच मोबाईल असा एकूण 44 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल केलेल्या या दहा जुगाऱ्यात संजय नांदेश्वर वय 53 वर्षे रा रमानगर, स्वप्नील गेडाम वय 29 वर्षे रा जयभीम चौक कामठी ,राजेंद्र फुले वय 59 वर्षे रा रमानगर,सुजल गोलाईत वय 19 वर्षे ,राकेश गोरखेडे वय 40 वर्षे, सुबोध विकास रंगारी वय 22 वर्षे ,रमेश वैद्य वय 60 वर्षे ,मनोज बांबोर्डे वय 40 वर्षे, प्रतीक देशभ्रतार वय 35 वर्षे ,संजीव बोरकर वय 33 वर्षे सर्व रा रमानगर कामठी असे आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खैरी शिवारातील बनावट डिझेल कारखान्यावर जुनी कामठी पोलिसांची धाड.

Fri Dec 30 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 25 हजार लिटर बनावट डिझेल जप्त,22 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त.. कामठी ता प्र 30 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्याहद्दीतील माउंट लीटरा झी स्कूल समोरील फ्रेंड्स ट्रान्सपोर्ट गोडाऊन मध्ये सुरू असलेल्या बनावट डिझेल कारखान्यावर जुनी कामठी पोलीस व अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता सुमारास धाड मारून 25 हजार लिटर बनावट डिझेल जप्त करून 22 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com