खैरी शिवारातील बनावट डिझेल कारखान्यावर जुनी कामठी पोलिसांची धाड.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

25 हजार लिटर बनावट डिझेल जप्त,22 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त..

कामठी ता प्र 30 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्याहद्दीतील माउंट लीटरा झी स्कूल समोरील फ्रेंड्स ट्रान्सपोर्ट गोडाऊन मध्ये सुरू असलेल्या बनावट डिझेल कारखान्यावर जुनी कामठी पोलीस व अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता सुमारास धाड मारून 25 हजार लिटर बनावट डिझेल जप्त करून 22 लाख 80 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची यशस्वी कारवाई जुनी कामठी पोलिसांनी केली आहे.

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील खैरी शिवारातील माउंट लिटरा झी स्कूल समोरील गिलफ्रेंड ट्रान्सपोर्ट गोडाऊन मध्ये बनावट डिझेल कारखाना सुरू असल्याची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी अन्नपुरवठा विभागाला माहिती देऊन त्यांच्यासह सायंकाळी पाच वाजता सुमारास संयुक्तरीत्या धाड मारून बनावट डिझेल कारखान्यातून पाच हजार लिटरच्या पाच टॅंक मध्ये बनावट डिझेल 3000 लिटर त्यांच्या एका टॅंक मध्ये 3000 लिटर एकूण 25 हजार 200 लिटर बनावट डिझेल घटनास्थळी दिसून आला .पोलिसांनी 25 हजार 200 लिटर, मोटार पंप ,मोजमापाचे साहित्य घटनास्थळावरून जप्त करून सील करण्यात आले आहेत. सर्व डिझेल व साहित्याची किंमत 22 लाख 80 हजार 900 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जप्त केलेल्या बनावट डिझेलचे नमुने शासकीय प्रयोगशाळा नागपूर येथे तपासणी परीक्षणाकरिता पाठविले असून शासकीय प्रयोगशाळे कडून अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील योग्य कारवाई करून आरोपीस अटक करण्यात येणार असल्याचे जुने कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांनी सांगितले आहे.अन्नपुरवठा अधिकारी पंकज पंचभाई यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू अधिनियम सह कलम 285 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून वरील कारवाई जुनी कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गडवे, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, गोपीनाथ राखुंडे ,हेडकॉन्स्टेबल राजेश गावंडे ,लक्ष्मीकांत बारंलीगे, विवेक दोषेटवार, दिलीप ढगे, श्रीकांत विष्णुरकर,अंकुश गजभिये,अनिल चहांदे ,ओमप्रकाश शिरसागर ,यांच्या पथकाने केली असून पुढील तपास ठाणेदार दीपक भिताडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश गडवे करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com