बुद्धभुमी येथे वर्षावास आरंभ 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार येरखेडा/ खैरी ,कामठी रोड येथे आषाढ पोर्णीमा निमित्त वर्षावास आरंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थान चे संस्थापक सचिव पुज्य डाॅ भदंन्त सावंगी मेधंकर यांच्या ८८ व्या जन्मदिन निमित्त त्यांच्या दाह-संस्कार स्थळावर चैत्य बांधकामाचे भुमीपुजन श्रीलंकेतील भदंन्त हापुतले विमलधम्म महास्थविर यांचे हस्ते रितसर करण्यात आले या प्रसंगी माजी कैबिनेट मंत्री व विधायक डॉ नितीन राऊत, रामटेक क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश भोयर, पंचायत समिती कामठी सभापती दिशा चनकापुरे, पंचायत समिती कामठी सदस्य सुमेध रंगारी, येरखेडा ग्रामपंचायत सरपंच सरीता रंगारी, ग्रामपंचायत सदस्य सुमित दुपारे अनिल पाटील, स्वतंत्र मजूर यूनियन चे उपाध्यक्ष ईंजी नरेंद्र जारोंडे, डॉ भदंन्त सावंगी मेधंकर स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष कासीनाथ मेश्राम,राहुल बाल सदन च्या संचालिका विमल आळे यांच्या विषेश उपस्थितीत व संस्थान चे अध्यक्ष आदरणीय पुज्य भदंत सत्यशील महास्थविर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाले. प्रास्ताविक सचिव भदन्त प्रज्ञाज्योती महास्थविर यांनी केले संचालन विश्वस्त भदंन्त नाग दिपंकर महास्थविर आभार प्रदर्शन माजी सचिव भदंन्त सिवनी बोधानंद महास्थविर यांनी केले उपरोक्त कार्यक्रमास डाॅ भदंन्त मेतानंद, भदंन्त पय्याश्री, आणी बुद्धभुमी श्रामनेर संघ उपस्थित होते.  उपरोक्त कार्यक्रमास मार्गदर्शन करतांना खासदार श्यामकुमार बर्वे तसेच माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी तथागत बुद्धाचा विश्वविख्यात मानवतावादी विचार पुनर्स्थापित करण्याच्या वाटचालीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रान्ती गतिमान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध विद्वान डाॅ भदंन्त आनंद कौसल्यायन यांनी केलेल्या कार्याला जनसामाण्यापर्यन्त पोहचविण्यासाठी ऋणानूबंध म्हणुन कर्तव्य तत्पर राहुन सेवा केली व कामठी रोड येरखेडा येथे बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार रूपी धंम्म संस्थागार निर्माण केले परिसराला तीर्थक्षेत्र व पर्यटन च्या दृष्टीनेच नव्हे तर सर्वसाधारण लोकांना प्रशिक्षण देऊन व्यक्तीमंत्व विकासाचे केद्र नागरी सोई सुविधांनी युक्त निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जाईल असे उदगार व्यक्त केले,डाॅ भदंन्त आनंद कौसल्यायन यांचे स्तुप, डाॅ भदंन्त सावंगी मेधंकर यांचे चैत्य, अशोक स्तभ नव निर्माण करण्याचे कार्य जनतेच्या आर्थिक सहकार्यातुन केले जात आहे सर्वांनी हातभार लावुन कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करावी असे आवहान करण्यात आले या प्रसंगी कामठी नागपुर परिसरातील उपासक उपासिका सह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कार्यक्रमास यशस्वी करण्या करीता बौद्ध प्रशिक्षण संस्थान, बुद्धभुमी श्रामनेर संघ, बुद्धभुमी दायक दायिका सभा, बुद्धभुमी धम्मसेवापथक यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुरुपौर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन सेंटर येथे एक दिवसीय ध्यान साधना शिबीर संपन्न

Sun Jul 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – गुरु पोर्णिमा व वर्षावस शुभारंभ प्रसंगी ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना कामठी :- धमचक्र प्रवर्तन दिन -आषाढी पौर्णिमा -गुरू पौर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन सेंटर येथे एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन सकाळी साडे नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आले होते.हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com