संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इस्माईल पुरा येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या सट्टा पट्टी अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना गतरात्री 11 दरम्यान यशप्राप्त झाले.पोलिसांनी धाड घालताच सर्वत्र पळापळ सुरू झाली दरम्यान पोलिसांनी तीन आरोपीवर गुन्हा दाखल केला असून आरोपीकडून नगदी 550 रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपीचे नाव कृष्णा बाबू वानखेडे वय 35 वर्षे रा नया गोदाम कामठी,अब्दुल गफ्फार उर्फ कल्लू वय 35 वर्षे रा नया गोदाम कामठी,प्रतीक शेंडे वय 35 वर्षे रा न्यू येरखेडा कामठी असे आहे.