संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
तीन दिवसात 46 लोकांवर कायद्याचा बडगा
कामठी :- शाळा,महाविद्यालयापासुन शंभर मीटर परिसरात तंबाकू तसेच तंबाकुजन्य पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर निर्बंध आहेत तरी पण या धूम्रपान विरोधी कायद्याची सर्रास अवहेलना करीत प्रत्यक्षात आजही अनेक शाळा महाविद्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तंबाकू ,सिगारेट विक्रीची दुकाने राजरोसपणे सुरू आहेत तेव्हा नागरिकांना धूम्रपान विरोधी कायद्यांचे पालन व्हावे, विदयार्थी दशेतील तरुणाई ही नशेच्या खाईत जाऊ नये, धुम्रपाणाला बळी पडू नये ही बाब गंभीरतेने लक्षात घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या परिसरात ‘ड्रग्ज फ्री’करण्याचा निर्धार करून प्रत्येक पोलीस स्टेशन च्या वतीने ‘नार्को फ्लश आऊट ‘मोहीम राबविण्याचे निर्देशित केल्यावरून नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी कामठी पोलीस स्टेशनला अँटी नार्को सेल उघडून नार्को सेल प्रमुख पदी पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे ची नियुक्ती केली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांनी पथकासह नार्को फ्लश आऊट मोहिमेला गती देत मागील तीन दिवसात 46 पांनठेलाचालकांवर दंडात्मक कारवाही करून 200 रुपयाचे चालान देऊन तंबी दिली.
सिगारेट व अन्य तंबाकुजन्य उत्पादने विक्री कायदा 2003 च्या तरतुदींनुसार शाळा, महाविद्यालय परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. शैक्षणिक संस्थेपासून शंभर मीटरच्या आत तंबाकू व तंबाकुजन्य पदार्थाच्या विक्रीला मनाई आहे मात्र प्रत्यक्षात शहरातील बहुतेक शाळा ,महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराच्या जवळच पानटपऱ्यावर तंबाकुजन्य पदार्थाची विक्री सर्रास होताना दिसते. यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानव्ये नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व पथक ने कामठी शहरात नार्को फ्लश आऊट मोहिमेला गती दिली आहे या गतीमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कामठी शहराचा मागील रेकोर्ड पाहता एनडीपीएस करवाहित अडकलेल्या आरोपींची यादी हातात घेऊन या आरोपींची झडती घेत त्याठिकाणी पाळत ठेवून अश्याप्रकारचे गैरकृत्य होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालय पासून 100 मीटर अंतरावर असलेल्या पांनठेला व टपरी वर सिगारेट वा तंबाकू विक्री होत असेल त्याविरोधात कारवाहीचा सपाटा सुरू केला आहे. यासाठी पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी विशेष पथक नेमले असून पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे तसेच पथकात सहभागी असलेले प्रमोद वाघ, ज्ञानेश्वर गायधने, गोरले आदीं मोलाची भूमिका साकारून कारवाहीचा सपाटा लावत आहेत तर या कारवाहीच्या सपाट्यामुळे अंमली पदार्थ विक्री करनारे, एनडीपीएस चे आरोपी, तंबाकू ,तंबाकुजन्य पदार्थ, सिगारेट विक्री करणारे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.