– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई
नागपूर :- दिनांक ३१/१२/२०२४ रोजी पोस्टे अरोली येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोस्टे अरोली हद्दीत मौजा खात शिवारात, खात ते महालगाव रोडच्या कडेला लागुन असलेल्या रियाजुद्दीन सिराजुद्दीन झडीये याचे शेतामध्ये खुल्या जागेत काही लोक ५२ ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशा खात्रीशीर माहिती वरून पोस्टे अरोली हद्दीत खात ते महालगाव रोडच्या कडेला लागुन असलेल्या रियाजुद्दीन सिराजुद्दीन झडीये याचे शेतामध्ये जुगार अड्डयावर रेड केली असता यातील आरोपी नामे-१) रियाजुद्दीन सिराजुद्दीन झडीये, वय ४२ वर्ष य. खात २) असलम मिनाजुद्दीन झडीये, वय ३० वर्ष, रा. खात ३) सुंदरलाल राजकुमार डहाके, वय ३० वर्ष, रा. खात ४) शरद भोजराजजी धावडे, वय ३३ वर्ष ५) रमन रामचंद्र पटले, वय ३० वर्ष ६) गौरव चंद्रभान लोहबरे, वय २१ वर्ष ७) अफजल इकबाल झडीये, वय २० वर्ष ८) आदीत्य रविंद्र चिंचुळकर, वय २१ वर्ष ९) वासुदेव श्रावण सोनवाने, वय ३४ वर्ष १०) योगेश राजेंद्र देवतारे, वय २९ वर्ष ११) उमेश मारोती बांते, वय ३२ वर्ष १२) विलास प्रकाश पालांदुरकर, वय ३० वर्ष १३) उमेश दिलीप चकाले, वय ३६ वर्ष १४) सचिन अनिल वाहने, वय ३८ वर्ष १५) सुमित रामेश्वर ढोलवार, वय ३० वर्ष १६) रजत शत्रुघ्न पटेल वय २९ वर्ष १७) रमेश अंकुश लांजेवार, वय ५१ वर्ष व १८) फरार आरोपी रूपेश सदानंद फंदी, वय २५ वर्ष १९) फरार आरोपी हर्षल कुंडलीक गिन्हेपुंजे, वय २० वर्ष २०) फरार आरोपी संदीप बाबुराव मेश्राम वय ३५ वर्ष २१) फरार हिरो कंपनीची काळ्या रंगाची एच एफ डिलक्स चा मालक हे हारजितचा जुगार खेळ खेळतांनी मिळुन आल्याने आरोपीतांकडुन १४ मोटरसायकल किंमती ११,४६,०००/-रू, ०१ चारचाकी कार किंमती २००००००/-, १७ मोबाईल किंमती ३८२०००/- रू., नगदी ४१०००/-रू., डावावरील नगदी २१००/-रू. ताश पत्ते २५ कॅट किंमती २५०/-रू. असा एकुण ३५,७१,३५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीताविरूद्ध पोस्टे अरोली येथे कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.