एसंबा-वाघोली रोडवर ट्रकच्या धडकेत वन प्राणी हरिणाचा मृत्यु
कन्हान : – पारशिवनी तालुकातील एसंबा-वाघोली  रोड वरून रात्रीला अवैद्य कोळसा व रेती वाहतुक कर णारे टँक्टर, ट्रक चोरीने बिनधास्त धावत असल्याने पहाटे सकाळी एका ट्रक चालकाने आपले वाहन नि ष्काळजीपणे वेगाने चालवुन रस्ता पार करणा-या वन प्राणी हरिणाला जोरदार धडक मारून पळुन गेल्याने हरिणाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही माहिती वन विभाग व कन्हान पोलीसाना दिल्याने पुरवा नष्ट कर ण्याच्या उद्देशाने मुत हरिणाला अज्ञात दोन व्यकती हरिणाला शेतात घेऊन जाताना वनमजुरास दिसल्याने ते दोघेही मुत हरिणाला शेतात सोडुन पळुन गेले. मुत हरिणाचा पंचनामा करून पुढील तपास वन विभाग व पोलीस स्टेशन कन्हान करित आहे.
                वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान व गोंडेगाव, घाटरोहणा, एंसबा परिसरात अवैद्य कोळसा व रेती चोरीचा धंदा बिनधास्त सुरू असुन असामाजि क तत्वाची मंडळी अवैद्य कोळसा व रेतीची वाहतुक पहाटे सकाळी टँक्टर, ट्रकने एंसबा ते वाघोली या मध ल्या रोडने नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा ने रामटेक, नागपुर कडे करित असल्याने रविवार (दि. २७) ला पहाटे सकाळी ४ ते ५ वाजता दरम्यान अश्या च एका ट्रक चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे वेगाने चालवुन एंसबा-वाघोली रोडवरील नाग मंदीर जवळील वळणावर रस्ता पार करणा-या एका हरिणा ला जोरदार धडक मारून पळुन गेल्याने हरिणाचा घट नास्थळी मुत्यु झाला. घाटरोहणा-एंसबा ग्रा प सदस्य अतुल गोरले हे सकाळी शौच्छास जात असताना रोड वर हरिणाचा ट्रकच्या धडकेत रक्त स्त्राव होऊन मुत पावल्याचे दिसल्याने त्यानी वन विभाग पटगोवारी व पोलीस स्टेशन कन्हान ला माहीती दिल्याने बखारी येथील वन मजुर ज्ञानेश्वर खंडाते, लिलाधर ठाकरे हे वरिष्ठाच्या आदेशाने घटनास्थळी पोहचले तर पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात दोन व्यकती मुत हरि णाला शेतातुन ओढत घेऊन जाताना दिसल्याने पाठ लाग केला असता ते मुत हरिणाला शेतात सोडुन पळुन गेले. पटगोवारी वन विभागाचे वनरक्षक श्रीकांत टेकाम हयांनी वनमजुर भोंडेकर ला सामोर पाठविले. कन्हान पोस्टे चे पोहवा मोहन शेळके, नापोशि सुधिर चव्हाण, चालक जितेंद्र गावंडे आदीने घटनास्थळाचे निरिक्षण करून भोला कांबळे च्या शेतातील मृत हरि णाला बखारीचे वनमजुर ज्ञानेश्वर खंडाते, लिलाधर ठाकरे यानी घटनास्थळी आणुन पंचनामा करून आप ल्या ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही वन विभागाचे वन रक्षक श्रीकांत टेकाम, वनमजुर भोंडेकर हे करीत आहे. याप्रसंगी घाटरोहणा(एंसबा) ग्रा प सदस्य अतुल गोरले, गोपाल गि-हे, नांदगाव उपसरपंच सेवक ठाकरे, धर्मदास उके, गोपाल तिरकमठे, लक्ष्मीकांत काकडे,  अजय ठाकरे, अधिकरण सुर्यवंशी, कुंदन ठाकरे,  निखिल गि-हे सह एंसबा, नांदगाव, वाघोली चे शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एंसबा, वाघोली च्या नागरिकांच्या ये-जा करण्या-या गाव रस्त्या वरून कोळसा, रेती च्या टँक्टर, ट्रक ची वाहतुक बंद करण्या ची मागणी चर्चेतुन करण्यात येत होती.
Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com