खापा :- दिनांक २१/०९/२०२३ चे १०.३० वा. सुमारास पो.स्टे. खापा हद्दीत फिर्यादी यांनी पोस्टेला येवून तोडी रिपोर्ट दिली की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय १५ वर्ष ही दिनांक २१/०९/२०२३ रोजीचे सकाळी १०/३० वा. शाळेत जाते म्हणून गेली परंतु शाळेत न जाता तिला कोणत्यातरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला फुसलावुन पळवून नेले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापा येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गेडाम या करीत आहे.