धान उत्पादकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री थेट बांधावर

– नागपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

– उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचीही भेट

 नागपूर :- नागपूर जिल्ह्यामध्ये २६ ते २८ नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने विशेषत: जिल्ह्यातील धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

नागपूर जिल्ह्यामध्ये २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नागपूर जिल्ह्यात मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी, सावनेर व हिंगणा या सहा तालुक्यात भात, कापूस आणि तूर या पिकांचे जवळपास ५ हजार ४८o हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत आज केली.

रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी दुपारी 3 च्या सुमारास मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांच्या शिवारात भेटी दिल्या. यावेळी त्यांनी थेट शेतात जाऊन धानपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तातडीने उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ३३५ गावांमध्ये या अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे. जवळपास २ हजार ८८o हेक्टरमधील ६ हजार ८८६ शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. आतापर्यंत ५२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, महसूल, पणन व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांचे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आगमन

Fri Dec 8 , 2023
– भंडारा, अमरावती, वर्धा व गडचिरोली दौरा नागपूर :- राज्यपाल रमेश बैस यांचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. 10 डिसेंबरपर्यंत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांचा गुरुवारी रात्री राजभवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!