क्रिकेट सटटयावर धाड एकूण ६१,००५/- रू चा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नागपूर :-दिनांक ०८.०८.२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन सावनेर हददीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय खबरीकडुन माहीती मिळाली कि तेलकामठी शिवारात एका फॉर्म हाउस वर बांग्लादेश व अफगाणिस्तान यांचे मध्ये खेळल्या जात असलेल्या एक दिवशीय क्रिकेट सामन्यावर बेटींग (सट्टा) लावुन जुगार खेळत असल्याची माहीती मिळाली अश्या माहीती वरून लागलीच मदतीला पोलीस स्टेशन सावनेर स्टॉफ सोबत घेवुन मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी रेड केली असता इसम नामे १. दिपक शंकर गोस्वामी, वय ३४ वर्ष देवकृपा सोसायटी, वर्धमान नगर, नागपूर, २. कुणाल बबनराव धापोडकर वय ३४ वर्ष, गमस्कासाथ इतवारी, नागपूर हे बांग्लादेश व अफगाणिस्तान यांचे मध्ये खेळल्या जात असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यावर बेटींग (सट्टा) लावून जुगार खेळत असतांना यांच्या कडुन जुगार खेळतांना चे साहीत्य मिळून आले.

१० मोबाईल संच कि ४६,०००/- रू. एक मोबाईल टॅब कि ११,०००/-रू, ईतर साहीत्य कि. ४००५/- रू असा एकुण ६१,००५/- रू चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर प्रकीयेकरीता पोलीस स्टेशन सावनेर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकुर, सफ चंद्रशेखर गडेकर, पोहवा. राजेंद्र रेवतकर, अमोल कुथे, पौना किशोर वानखेडे, आशिष मुंगले, उमेश फुलबेल, पोशि राहुल साबळे, तसेच पोलीस स्टेशन सावनेर वे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, गणेश राय, मोना रवि मेश्राम, पोशि सचिन लोणारे यांनी संयुक्तरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्याची गडद शोकात्म कथा प्रेक्षकांच्या प्रत्ययाला मांडण्याचा प्रमोद भुसारी यांचा प्रयत्न यशस्वी - वसंत आबाजी डहाके

Mon Jul 10 , 2023
– प्रमोद भुसारी यांच्या “भोवरा” पुस्तकाचे प्रकाशन थाटात संपन्न नागपूर :- जीएंच्या कथेवर प्रमोद भुसारी यांचे ‘भोवरा’ हे नाटक आधारित असून नाटकात पात्रांचे संवाद, स्थिती किंवा प्रसंग असतात, पात्रे आंगिक अभिनयातून मानसिक स्थिती व्यक्त करतात. कथेचे नाटकात रूपांतर होते तेव्हा कथेतल्या पात्रांचे बोलणे नाटकात घेतले जाऊ शकते. कथेच्या निवेदनाचा भाग काही संवादातून तर काही हावभावातून दाखवला जाऊ शकतो. कथा वाचायची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com