सदोष मनुष्यवध घडवून आणणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

पारशिवनी :- दिनांक ०९/११/२०२० ते २२/२४ वा. दरम्यान फिर्यादी नामे सरकारतर्फे पोना/५७९ मनीराम नेवारे पो.स्टे. पारशिवनी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. पारशिवनी येथे अप, क्र. २८५/२० कलम ३०४,२०१ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

दिनांक १२/१०/२०२० चे ०९/०० वा. दरम्यान यातील आरोपी नामे बापुराव गणपत मिसार वय ६९ वर्ष रा. कोंढासावळी याने आपले शेतात कोंबडयाचा कुटाराचे संरक्षणाकरीता जाळीचे कंपाउंड लावुन त्या कंपाऊंड जवळ लाकडी खुटया गाडुन त्या खुटयाला लोखंडी बारीक तार बांधुन त्या तारेला इलेक्ट्रीक करंट लावुन ठेवले असता घटना तारीख वेळी यातील मृतक नामे प्रदीप रामराव बावने वय २८ वर्ष रा. कोंढासावळी हा आरोपीच्या शेताकडे गेला असता मृतकास इलेक्ट्रीक तारेवा करंट लागल्याने जागीच मरण पावला,

सदर प्रकरणाचे तपास पोउपनि विनायक नागुलवार यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. न्यायमुर्ती आर आर भोसले, जिल्हा व सत्र न्यायालय १० नागपूर कोर्टामध्ये सादर केले, आज दिंनाक १०/०१/२०२४ रोजी मा. न्यायमुर्ती आर आर भोसले, जिल्हा व सत्र न्यायालय १० नागपूर यांनी वरील नमुद आरोपीस कलम ३०४ (भाग २) मध्ये ०३ वर्ग सश्रम कारावास तसेच १,२०,०००/- रू दंड. दंड न भरल्यास ०१ वर्ष सश्रम कारावास तसेच कलम २०१ भादवि मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- रू दंड, दंड न भरल्यास ०१ वर्ग साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारने वतीने एपीपी शेंदरे सो. यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन मपोहवा स्मिता मोहनकर पो.स्टे. पारशिवनी यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

Thu Jan 11 , 2024
मौदा :- अंतर्गत १५ किमी अंतरावर मौजा गुमथाळा शिवार कामठी जि. नागपुर येथे दिनांक १०/०१/२०२४ चे ०५.०० वा. ते ०५.४५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील पोलीस पथक पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौदा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com