जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

मौदा :- अंतर्गत १५ किमी अंतरावर मौजा गुमथाळा शिवार कामठी जि. नागपुर येथे दिनांक १०/०१/२०२४ चे ०५.०० वा. ते ०५.४५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील पोलीस पथक पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौदा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम-३५/एच-२९४३ मध्ये आरोपी नामे- १) सम्राट कांतीलाल येवले, वय ३१ वर्ष रा. इंदीरा नगर गोरेगाव, ता. गोरेगाव, जि. गोंदीया २) रजत साखरे, वय ३० वर्ष, रा. तुमसर, ता. गोरेगाव, जि. गोंदीया यांनी त्याच्या ताब्यातील वाहनात ०६ बैल, ०३ गाय, ०२ गोरे असे एकुण ११ (जनावरे /गौवंश) त्यांचे तोंड दोरीने बांधून त्यांना क्लेशपणे वागणूक देवून त्यांची कोणत्याही प्रकारची चारापाण्याची व्यवस्था न करता वाहनात श्वास घेता येणार नाही अशा प्रकारे कॉवून अवैधरित्या पिकअप वाहना मध्ये भरून कत्तलीकरीता घेवून जातांना मिळून आल्याने सदर वाहनातील ११ (जनावरे / गौवंश) प्रत्येकी जनावरे किंमती १०,०००/-रू प्रमाणे एकूण १,१०,०००/-रू व महेंद्रा बोलेरो पिकअप किंमती ५,००,०००/-रू असा एकूण जनावरे व वाहन किंमती ६,१०,०००/-रू चा मुद्देमाल वाहतूक करतांना मिळुन आल्याने सदर आरोपीतांविरूद्ध पोस्टे मौदा येथे कलम ११(१) (डी), ५ए, ९ महाराष्ट्र पशु संरक्षण १९७६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वीज ग्राहकांची ‘ऑनलाईन’ भरारी

Thu Jan 11 , 2024
नागपूर :- वीज ग्राहकांना सदैवच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महावितरणने लघु व उच्च दाब ग्राहकांना विजबिल भरण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आधुनिक सुविधांचा वापर करीत 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षभराच्या काळात महावितरणच्या नागपूर परिमंडलातील लघुदाब वीज ग्राहकांनी तब्बल 60.24 टक्के रकमेचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरण्यास पसंती दिली आहे. विशेष म्हणजे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com