‘स्वनाथ’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोकहिताचे काम घडत आहे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- स्वनाथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनाथांसाठी एक चळवळ उभी राहत आहे या संस्थेने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

चेंबूर विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्ट‍िट्यूट येथे स्वनाथ फाऊंडेशन तर्फे ‘प्रत्येक बालकाला हक्काचा परिवार’ या विषयी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत जिल्हा संयोजकांकरिता आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालविकास मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापक तथा अध्यक्षा श्रेया भारतीय, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्ट‍िट्यूटचे संचालक सतीश मोध, स्वनाथ फाऊंडेशनचे विश्वस्त गगन मेहता, सारिका मेहता आदी उपस्थित होते.

मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, स्वनाथ फाऊंडेशनने कमी कालावधीत अनाथ बालकांसाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. शासनाकडून या कामासाठी सहकार्य करण्यात येईल. अशा प्रकारे सेवा भावी संस्था समाजात काम करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. याबाबत स्वयंसेवी संस्थाकडून काही सूचना आल्या, तर शासन त्यावर उपाययोजना व नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी काम करेल, असेही मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Thu Aug 17 , 2023
मुंबई :- राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!