नागपूर – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपुरात आयोजित फोटो गॅलरी प्रदर्शनी मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमेटी द्वारे या आयोजनाचे कौतुक केले. प्रसंगी नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक प्रामुख्याने उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाईन्स येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स समोरील प्रेस क्लबमधील प्रदर्शनात तब्बल सहा वेळा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवनपट उलगडून दाखविणारी छायाचित्रे लावण्यात आली. या प्रदर्शनाला महाविद्यालय तरूणतरुणींसह आबालवृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याच पाश्र्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदर्शनी ला भेट दिली.
यावेळी कृष्ण कुमार पांडे, रत्नाकर जयपुरकर, सुरेश पाटील, दिपक खोब्रागडे, दिनेश यादव, अभिषेक धवड, इरशाद शेख, सतीश पाली, निलेश खोबरागडे, अनिरुद्ध पांडे, चेतन मेश्राम, कल्पना द्रोणकर, रेखा लांजेवार, बिलाल नुरानी, सागर उइके, निखिल सहारे, शेख शहनवाज, चेतना गोडाने, गोविन्द गौरे, निशाद इंदुरकर, नावेद शोख, अकित गोहाट, विद्या सागर त्रिपाठी, उज्वल खापरडे, जनल औयस, रोनक नादगावे, हर्ष बरडे, पारस गजभिये उपस्थित होते.