नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय लोकशाही दिनाच्या उपक्रमात सहा प्रकरणे निकाली निघाली. आज 21 प्रलंबित तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच एक तक्रार प्राप्त झाली आहे.उपायुक्त आशा पठाण, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) विशाल शिंगुरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बालविकास, भूमापन, लेखा व कोषागार आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.