उस्मानाबाद जिल्ह्यातील अनाथालयाचे अनुदान मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला-बालविकास अधिकाऱ्यांची चौकशी होणार…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर, दि. ३० डिसेंबर – उच्च न्यायालयाकडून अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना असतानाही ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रसेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा यांच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ‘आपले घर’ या अनाथालयाला अनुदान देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. संस्थेच्या किराणा बिलात त्रुटी, आधारकार्ड नाही यासारखी कारणे दाखवून दिरंगाई केली जात आहे. बदललेल्या काळाप्रमाणे वागा, असे सांगून लाच देण्याची मागणी केली जात आहे, अशी माहिती देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना अजित पवार यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रसेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा नळदुर्ग येथे ‘आपले घर’ हे अनाथालय चालवित आहेत. ३० ऑक्टोबर १९९३ रोजी लातूर व उस्मानाबाद (धाराशिव) येथे झालेल्या भुकंपामध्ये मृत्यू पावलेल्या पालकांच्या अनाथमुलांसाठी हे अनाथालय त्यांनी सुरु केले होते. या अनाथाश्रमाच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. पहिल्या वर्षी २५० – ३०० मुले असणाऱ्या या अनाथालयात मुलांची संख्या वाढत असून २००० पासून या संस्थेला शासकीय अनुदान सुरु झाले आहे. २०१३ – १४ व २०१४-१५ चे २५ लाख १२ हजार अनुदान प्रलंबित राहिल्याने संस्थेने औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाद मागितली.

उच्च न्यायालयाने सदरचे अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतरही महिला व बालकल्याण विभागाने त्याप्रकरणात काही त्रुटी काढणे, एका किराणा बिलात घोळ आहे व ट्रस्टचे आधारकार्ड नाही अशा वेगवेगळ्या कारणांची त्रुटी काढून वेळोवेळी अनुदान नाकारले आहे. या प्रलंबित अनुदानातील त्रुटीच्या पुर्ततेसाठी श्री सुराणा वैयक्तिकरित्या पुणे येथील महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात गेले असता संबंधित अधिकाऱ्याने त्रुटीसंदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली. काळ बदललेला आहे तुम्हीही बदला, तरच कामे होतील, असे सांगुन वेगळ्या प्रकारे लाचेची मागणी केली. राज्यातील अनेक अनाथाश्रमाचे अनुदान रोखण्यात येत असून लाच दिल्याशिवाय अनुदान वितरीत केले जात नाही, ही वस्तुस्थिती सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिला व बालकल्याण विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रालयातील शिपाई कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या बोगस भरती प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, फसवलेल्या तरुणांना न्याय द्या - अजित पवार

Fri Dec 30 , 2022
मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल;वरिष्ठांच्या भूमिकेची चौकशी करुन कडक कारवाई करणार;विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा नागपूर, दि. ३० डिसेंबर – मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचे नाटक घडवून आणले. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights