नवीन कामठी पोलिसांनी दिले 48 गोवंश जनावरांना जीवनदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27:-नागपूर -जबलपूर महामार्गावरील लिहिगाव मार्गे गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिस स्टेशन चे पोलीस उपनीरीक्षक श्याम वारंगे यांना मिळताच पोलिसानी सापळा रचुन काल 26 मे ला दुपारी 2 दरम्यान लिहिगाव मार्गावरील खांडेकर ढाब्याजवळ गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दहा चाकी कंटेनर ट्रक वर यशस्वीरित्या धाड घालीत आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेत ट्रक मध्ये निर्दयतेने व क्रूरपणे कोंबून ठेवलेले व कत्तलखान्यात कत्तलीसाठी घेऊन जात असलेले 48 गोवंश जनावरे ताब्यात घेत या गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जाणाऱ्या 48 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कामगिरी नवीन कामठी पोलिसांनी केली असून या धाडीतुन जप्त दहाचाकी कंटेनर ट्रक, एक मोबाईल व 48 गोवंश जनावरे असा एकूण 36 लक्ष 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लिहिगाव मार्गावरील खांडेकर ढाब्याजवळ सापळा रचून दहा चाकी कंटेनर ट्रक क्र एम पी 07 एच बी 1995 वर धाड घालून ट्रक ची तपासणी केली असता ट्रक मध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता जनावरांची निर्दयतेने व क्रूरतेने 10 ते 12 वर्षे वयोगटातील 48 गोवंश जनावरे कोंबून बांधून दिसले असता आरोपी ट्रकचालकाची विचारपूस केली असता ट्रकचालकाने असमाधानकारक उत्तर दिल्याने ट्रक चालकावर गुन्हा नोंदवित अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव शफिक अहमद रशीद खान पठाण वय 44 वर्षे रा भोपाल , मध्यप्रदेश असे आहे तसेच आरोपी जनावरं विकत घेणारा मूळ मालक व ट्रक मालक यांचा शोध अजूनही सुरू आहे.पोलिसांनी जप्त ट्रक सह जनावरे ताब्यात घेत जनावरे नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले तर या कार्यवाहितून जप्त दहा चाकी कंटेनर ट्रक किमती 22 लक्ष रुपये, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किमती 5 हजार रुपये व जप्त 48 गोवंश जनावरे किमती 14 लक्ष 40 हजार रुपये असा एकूण 36 लक्ष 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी चिन्मय पंडित, एसीपी नयन आलूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, डी बी पथकाचे इंचार्ज हेडकान्स्टेबल संदीप सगणे, नायक पोलीस शिपाई संदेश शुक्ला,पोलीस कान्स्टेबल कमल कनोजिया, सुरेंद्र शेंडे, अनिकेत सांगळे, लवकुश बनोसे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.

Next Post

रब्बानी द्वारा राज्य पुरस्कार प्राप्त नसीम का सत्कार

Fri May 27 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27- एम एम रब्बानी हाय स्कूल व जूनियर कॉलेज, कामठी द्वारा राज्य पुरस्कार प्राप्त शाला के वरिष्ठ शिक्षक नसीम अख्तर मोहम्मद सईद का सत्कार किया गया । इस सत्कार समारोह के अध्यक्ष जनाब मोहम्मद अल्ताफ़ उर रहीम ( उपाध्यक्ष, मदरसातूल मुसलेमीन ट्रस्ट, कामठी )  और मुख्य अतिथि के रूप में जनाब अल्ताफ़ुर्रहीम ( […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com