मुंबई :- चंद्रपूर शिक्षणाधिकारींच्या कामकाजात अनियमतेता प्रकरणी संबधितांना नोटीस देण्यात आली असून आयुक्त (शिक्षण), पुणे यांच्या स्तरावरुन शिक्षणाधिकारींच्या विरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल आठवड्याच्या आत दिला जाईल, त्यावर आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) चंद्रपूर यांच्या कामकाजातील अनियमततेची चौकशी करण्याबाबतच्या संदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते.
विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत तपासणी समितीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) चंद्रपुर यांच्या कार्यालयाच्या केलेल्या तपासणीत शिक्षक व शिक्षेकतर कर्मचा-यांची वरिष्ठ / निवड श्रेणी, वैद्यकीय प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे व इतर अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे निर्दशनास आले आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने सुरु असेलेल्या विभागीय चौकशीचा अहवाल आठवड्याच्या आत दिला जाईल,त्यानुसार आवश्यक ती कारवाई केल्या जाणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.