संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 30 :- सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा.सेवानिवृत्ती ही नवी वृत्ती व आवृत्ती असून सेवानिवृत्ती नंतर दैनदिन कार्यालयीन कार्या पेक्षा नवं कार्य करण्याची प्रेरणा मिळते. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य. एकदा का आनंदाचा ठेवा सापडला, की निवृत्तीचा अर्थ उमजायला लागतो,असे प्रतिपादन पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी प्रा विनोद भट यांना निरोप देताना म्हणाले.
सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा विनोद भट यांचा
आज निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी बागडे यांच्या हस्ते प्रा विनोद भट यांना शाल , श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.निवृत्ती म्हणजे नोकरी व्यवसायातून निवृत्ती.जीवनातून नव्हे,आयुष्याला पूर्णविराम असून,स्वल्पविराम असतो कारण अजून बरेच वर्ष बाकी असते,असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बागडे सर निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी मंचावर पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल व प्रमुख अतिथी म्हणून प्रा व्ही बी वंजारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा आशिष क्षीरसागर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा हर्षा गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.