देवलापार :- दिनांक १६/१०/२०२३ रोजी पोलीस स्टेशन देवलापार येथील स्टाफ देवलापार हद्दीत पेट्रोलिंग करित असताना मुखबिरद्वारे खबर मिळाल्याने स्टाफने मौजा गोवरवाही हिवराबाजार रोड येथे नाकाबंदी केली असता एक टिप्पर येतांना दिसला. सदर १२ चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४० / एम- ३५२७ यास थांबवुन तपासले असता सदर वाहनात चालक आरोपी नामे दुश्यंत शेषराव हुके, रा. वलनी ता. सावनेर जि. नागपुर यास गाडी मध्ये कोणता मुद्देमाल आहे असे विचारले असता चालकाने गाडी मध्ये रेती आहे असे सांगितले. त्याला रेतीच्या परवाना बाबत विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले व सदर रेती पोनगट्टा एमपी मधुन चोरुन आणल्याचे सांगितले. १२ चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४० / एम-३५२७ मध्ये १० ग्रास रेती अवैधरित्या विना परवाना चोरुन आणल्याचे दिसुन आल्याने आरोपीचे ताब्यातील १० ग्रास रेती ३०००/- रु. ब्रास प्रमाणे ३०,००० /- रुपयाचा मुद्देमाल व १२ चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४०/ एम. ३५२७ किमती अंदाजे ४,०००,०००/-रु. असा एकूण ४,०३०,०००/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विनापरवाना चोरून आणल्याचे दिसुन आल्याने सदरचा टिप्पर रेतीसह जप्त करून ताब्यात घेतला.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोशि केशव फड, पोस्टे देवलापार यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. देवलापार येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवि सहकलम ४८ (८) महाराष्ट्र जमिन महसूल कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला सूचनापत्रावर सोडण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार रंगारी, पोस्टे देवलापार हे करीत आहे.