संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेला प्राधान्य द्या – मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली परिसराची पाहणी

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बुधवारी (ता.११) दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी मनपाचे अधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता अजय मानकर, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक अधीक्षक धनंजय जाधव, झोनल अधिकारी रामभाउ तिडके, उपअभियंता राजेंद्र राठोड, केंद्र अधिकारी  तुषार बाराहाते आदी उपस्थित होते.

२४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत. २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लाखोंच्या संख्येत येणा-या बौद्ध अनुयायांना आरोग्यपूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबाबत आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

यावेळी त्यांनी दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट studies अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेली तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, माता कचेरी परिसर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथील शौचालयाची व्यवस्था या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. दीक्षाभूमी स्तूप, तसेच सर्व मार्ग आणि शौचालयांच्या ठिकाणी वीज पुरवठा निरंतर सुरू राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे तसेच प्रसाधनगृहांमध्ये वीज पुरवठ्यासोबतच निरंतर पाणी पुरवठा देखील ठेवणे आणि सर्व शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी हँडवॉशची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रादेशिक सेनेमध्ये सैन्य भरती

Thu Oct 12 , 2023
भंडारा :- माजी सैनिक यांच्या करीता 136 इंफन्ट्री बटालीयन (प्रादेशिक सेना) ईको मध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत भरती सुरु होत आहे. Sol GD-87 पदे (महाराष्ट्रचे रहवासी करीता) तर Clk GD 06 पदे, शेफ कॉमुनिटी 01 पद, हॉऊस किपर- 01 पद, ब्ल्याक स्मिथ -01 पद, मेस किपर- 01 पद, आर्टिसन -01 पद अनुक्रमे ऑल इंडिया बेसीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!