ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन

– सीयावर रामचंद्र की जय घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला

नाशिक :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली.

यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8 व्या अध्यायाचे (श्लोकांचे) (ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे), वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला.

स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री मोदी यांचे अभिवादन

मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिवृष्टीग्रस्ताना मदत तातडीने करा भाजप शिष्टमंडळाचे निवेदन

Fri Jan 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्ताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांनी प्रत्येकी 10 हजार ची मदत केली परंतु जवळपास 250 लोकांना तांत्रिक अडचणी मुळे अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. तहसील आणि नगर परिषद कार्यालयाने समन्वय साधुन सर्व पात्र नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी भाजपा पदाधिकारीच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार एस आर बमनोटे याना निवेदना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com