राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर

Ø मेडिकलचा अमृत महोत्सव व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी

Ø मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचीही उपस्थिती

नागपूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर येत आहेत.शुक्रवार १ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर शनिवार २ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रासह मध्य भारताच्या अनेक राज्यांचे विश्वासार्ह, खात्रीलायक, किफायतशीर उपचाराचे केंद्र असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृतमहोत्सव उद्घाटन सोहळा मेडिकलच्या मैदानावर १ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते डाक तिकीट कव्हरपेजचे अनावरण आणि मेडिकलच्या नवनिर्मित सभागृहाचे डिजीटल उद्घाटन होणार आहे. मेडिकलशी संबंधित चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार आहे.या कार्यक्रमातच राज्यपालांच्या हस्ते मेडिकलच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे तसेच कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या उद्घाटनीय सोहळ्यानंतर वर्षभर विविध कार्यक्रम मेडिकलमार्फत नियोजित करण्यात आले आहे. उद्याचा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे. हा अमृत महोत्सवी सोहळा अत्यंत अभिमानाची बाब असून निमंत्रित मेडिकलच्या माजी विद्यार्थ्यांनी यास उपस्थित रहावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांनी केले आहे. दुपारी २.३० पर्यंत निमंत्रितांनी आपली जागा घ्यावी,असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

शनिवार,२डिसेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुरच्या 111वा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे.हा सोहळाही निमंत्रणासाठीच आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रभर एफडीसीएम अधिकारी, कर्मचारी 1 डिसेंबर पासुन "अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन"

Fri Dec 1 , 2023
– सातव्या वेतन आयोगाची थकबाकीसाठी…. नागपूर :- महाराष्ट्रभर एफडीसीएम अधिकारी, कर्मचारी 1 डिसेंबर पासुन “अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन” करुन हिवाळी अधिवेशन पुर्वी पुर्णपणे काम बंद करुन प्रशासनाचे कामकाज ठप्प करणार असल्याची माहिती एफडीसीएम संघटना पदाधिकारी यांनी माहिती दिली. वनविकास महामंडळाच्या मुख्य प्रशासकिय एफडीसीएम भवन नागपुर, नाशिक, चंद्रपुर, भंडारा, यवतमाळ, किनवट, पुणे, ठाणे, गोंदीया या ठिकाणी महामंडळातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com