स्टेट बँक,Electoral Bonds आणि बिनडोकांचा बाल्या डान्स

कालपासून सगळीकडे एकच हेडलाईन झळकत आहे “सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला जोरदार दणका.१२ मार्चच्या संध्याकाळपर्यंत स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बॉण्ड्सची सर्व माहिती द्यावी. मुदतवाढीचा अर्ज फेटाळण्यात येत आहे.”

सगळे भाजपविरोधक खुशीने नाचायला लागले. यात चाय बिस्कीट पत्रकार, HMV संपादक आघाडीवर होते.डाव्या इकोसिस्टीमला खूप दिवसांनी शुभवर्तमान मिळाले असे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे की आता मोदी सरकारची काही धडगत नाही.भाजपला हा फार मोठा दणका आहे. निवडणूक घोषित होण्याच्या चारच दिवस आधी हा निकाल आल्यामुळे आता भाजप अडचणीत सापडेल वगैरे वगैरे इमले रचले जाऊ लागले.

अनेक भाजप समर्थक हबकून गेले.काही अस्वस्थ भाजप समर्थकांनी मला फोन करून याबद्दल तुला काय म्हणायचे असे विचारले. काल संध्याकाळी मी बिझी होतो म्हणून मी उत्तर देऊ शकलो नाही. काल नक्की काय घडले ते समजल्यावर हा खुलासा करणे आवश्यक वाटले म्हणून सकाळी सकाळी पोच लिहीत आहे. थोडक्यात सांगतो.

काल कोर्टात झालेल्या वादविवादात तीन प्रश्नांची उत्तरे महत्त्वाची आहेत.

कोणत्या कंपनीने किती रुपयाचे Electoral Bonds EB विकत घेतले ?

कोणत्या राजकीय पक्षाला किती पैसै EB च्या माध्यमातून मिळाले ?

कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती रुपयांची मदत EB च्या माध्यमातून केली ?

खंडपीठाने ऑर्डर दिल्यानंतर हरीश साळवे म्हणाले

“कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला मदत केली ती माहिती आज देण्याची आवश्यकता नाही ना ? कारण ते वेळखाऊ काम आहे. आम्हाला मुदतवाढ या साठी हवी होती.नुसती नावे जर द्यायची असतील तर ते सहज शक्य आहे.”

यावर खंडपीठानेने खुलासा केला की

“Our directions require SBI to disclose information which is already available,” Chandrachud said. “We have not told you to do the matching exercise … simply comply with the judgment. You have the details.”

“आम्ही फक्त कंपन्यांची नावे आणि राजकीय पक्षांची नावे उघड करा असा आदेश दिला आहे.त्यांचा एकमेकांशी संबंध जोडून द्या असे म्हटले नाही.कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती रुपयाची मदत केली हे correlation उद्या संध्याकाळपर्यंत द्या असे आदेश आम्ही दिलेले नाहीत .”

ज्या गोष्टीसाठी मुदतवाढ मागितली होती ती गोष्टच द्यायची नाही म्हटल्यावर कालचा सुनावणीत खरे तर काही अर्थच नव्हता.जी माहिती सहज उपलब्ध आहे तीच द्यायची आहे.अर्जदाराचे वकील प्रशांत भूषण यांनीही हे मान्य केले.

मोदी विरोधकांना जी माहिती जाणून घेण्यात प्रचंड उत्सुकता आहे ती माहिती आज संध्याकाळपर्यंत मिळणार नाही कारण कोर्टाचा तसा आदेशच नाही.

थोडक्यात काय अदानी आणि अंबानी यांनी भाजपला किती कोटी रुपये दिले याची माहिती उद्या मिळणार नाही भविष्यात कधी मिळेल त्याबद्दल आज काहीही सांगता येणार नाही.

ऑर्डर न वाचताच अनेक बिनडोक बाल्या डान्स करत आहेत.

– CA आनंद देवधर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेक से कुणाल राऊत की उम्मीदवारी FINAL लेकिन केदार राह में रोड़ा?

Fri Mar 15 , 2024
– खास करीबी का दावा टीम क्षेत्र में सक्रीय हो गई है, सैकड़ों करोड़ खर्च की तैयारी चर्चा.. रामटेक :- लोकसभा चुनाव के मद्देनज़र कांग्रेस पार्टी ने सम्पूर्ण देश में कुछ उम्मीदवार निश्चित की है,जिसमें युवक कांग्रेस कोटे से 2 उम्मीदवार तय किये है,जिनमें युवक कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष SRINIVAS BV और महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष KUNAL RAUT का लगभग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights