विद्यार्थ्यांच्या संशोधनातून सामाजिक समस्या सुटतील – जिल्हाधिकारी

– विद्यापीठातील रिसर्च व इन्क्युबेशन विभागात रोबोथॉन प्रदर्शनीचे उद्घाटन

अमरावती :- विद्यार्थ्यांच्या संशोधनातून सामाजिक समस्या दूर करण्यासाठी संशोधन केले जात असून फोटोटाईप्सच्या माध्यमातून सादर केलेल्या संशोधनातून सामाजिक कार्यासाठी निश्चित मदत होईल, त्यातून सामाजिक समस्या सुटण्यास हातभार लागेल, असे प्रतिपादन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ आणि विद्यापीठ रिसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त रोबोथॉन प्रदर्शनीचे आयोजन सोमवार 16 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता विद्यापीठ परिसरातील रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन, भौतिकशास्त्र विभाग याठिकाणी करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

फित कापून रोबोथॉन प्रदर्शनीचे जिल्हाधिकारी यांनी उद्घाटन केले. मार्गदर्शनपर बोलतांना ते म्हणाले, पाचही जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांनी संशोधनपर फोटोटाईप डिस्प्ले केले आहेत. तरुण विद्याथ्र्यांच्या मनात असलेल्या नवकल्पना ज्या सामाजिक कार्यासाठी मदत करण्यास उपयुक्त ठरतात. आपातकालीन परिस्थितीची हाताळणी, कृषि, विकासासाठी आवश्यक, वेगवेगळ्या क्षेत्रातील अडचणींवर मात करणारे संशोधनात्मक फोटोटाईप्स विद्याथ्र्यांनी तयार केले आहेत. फोटोटाईप्सचा प्रात्यक्षिक उपयोग करण्यासाठी प्रशासनातर्फे विद्याथ्र्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले व सहभागी विद्याथ्र्यांना शुभेच्छा दिल्यात.

प्रदर्शनीमध्ये नवसंशोधक विद्याथ्र्यांनी विविध प्रकारचे संधोनात्मक साहित्य सादर केले होते. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अमरावती, ए.पी.जे. अब्दुल कलाम आझाद महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रशिक्षण महाविद्यालय, अमरावती, प्रो. राम मेघे तंत्रशिक्षण महाविद्यालय, अमरावती आदी महाविद्यालयांच्या विद्याथ्र्यांनी या प्रदर्शनीमध्ये आपले संशोधनसाहित्य सादर केले होते. जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार यांनी प्रत्येक विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या संशोधनसाहित्याला भेटी देऊन त्यांची उपयुक्तता विद्याथ्र्यांकडून जाणून घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, नॅशनल एन्व्हायरमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिटूट (निरी), नागपूरचे प्रमुख तथा वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश बिनीवाले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विभागाच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर तसेच विभागातील शिक्षक, कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खबरदार ...जर विना परवानगी होर्डिंग लावाल तर - मुख्याधिकारी संदीप बोरकर

Mon Oct 16 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सध्या सणोत्सवाची रेलचेल असून काही दिवसानंतर कामठी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे तेव्हा पोस्टर वार शुभेच्छुकांचा जणू काही वर्षाव होणार असल्याने वाटेल त्या ठिकाणी नगर पोस्टर, बॅनर ,होर्डिंग ची उभारणी करून देखावा करीत स्वतःची प्रसिद्धीचे चित्र निर्माण होणार असल्याचे दृष्टिक्षेपास येते मात्र हे सर्व प्रसिद्धीच्या झोकात जाहिरात होर्डिंग लावताना कामठी नगर परिषदची परवानगी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com