संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी परिसरातील 40 वर्षे जुने धोबीघाट च्या ठिकाणी पोलीस विभाग कार्यरत होणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून ही माहिती येथील धोबी व्यवसायिकांच्या व्यवसायावर गंडांतर आणणारे असून रोजगार हिसकावणारा प्रकार आहे तेव्हा येथील दिग्गज लोकप्रतिनोधीच्या शासकीय निधीतून निर्माण झालेल्या धोबिघाटवर पोलीस विभाग कार्यरत झाल्यास धोबी व्यवसायिकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे यासाठी धोबी समाजात एकच चर्चेचा विषय ठरला असून न्यायिक हक्कासाठी धोबी समाज प्रशासनाकडे धाव घेत आहे तसेच भाजी मंडीच्या जागेवर निर्माण होणारे डीसीपी कार्यालय हे नागरिकांच्या सुरक्षात्मक दृष्टीकोणातून योग्य आहे या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे .याचा आम्हा धोबी समाजबांधवांना कुठलाही विरोध नाही ,आम्ही लढा घेतला तो फक्त धोबीघाटासाठी…मात्र काही समाजमाध्यमावर धोबी समाज डीसीपी कार्यालय च्या निर्माणाधिन चा विरोध करीत असल्याचे खोटे मेसेज व्हायरल करून धोबी समाजाची बदनामी करीत आहेत तेव्हा अशा खोट्या व भडकाऊ मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाही करावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवावी या मागणीचे सामूहिक निवेदन महाराष्ट्र राज्य धोबी (परिट)समाज महासंघ शाखा कामठी च्या वतीने माजी नगरसेवक संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
भाजी मंडी परिसरातील त्रिकोणी चौकात मागील चाळीस वर्षापूर्वी पासून धोबी घाट कार्यरत असून येथील बहुतांश धोबी व्यवसायिक या धोबी घाट च्या आधारावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. माजी आमदार स्व यादवराव भोयर यांनी सन 1985 मध्ये आमदार निधीतून या धोबीघाटात कपडे धुण्यासाठी पाण्याच्या टाकीचे निर्माण करून दिले होते.माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या निधीतून विहिरीचे निर्माण करण्यात आले होते.माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निधीतून धोबी घाट ची सुरक्षाभिंत बांधण्यात आली आहे तसेच नगर परिषद प्रशासन द्वारे या धोबी घाट मध्ये सुव्यवस्थेच्या माध्यमातुन पथदिवे,बोरिंग,सोलर लाईट आदींची व्यवस्था केलेली आहे आणि शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या या धोबीघाट वर पोलीस विभाग कार्यरत होणार असल्याने येथील धोबी व्यवसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.तेव्हा यातून पर्यायी मार्ग काढून धोबी व्यसायिकांचा रोजगार हिरावणार नाही आणि धोबीघाट कायम राहावे अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.मात्र काही बेधुंद नागरिक सोशल मीडियाच्या आधारे भाजी मंडीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डीसीपी कार्यालयाचा विरोध करीत आहेत असा खोटा मेसेज व्हायरल करून धोबी समाजाची बदनामी करीत आहेत ज्यामुळे धोबी समाजात असंतोषाचे वातावरण आहे.तेव्हा धोबी समाजाच्या रागाचा अंत न पाहता शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे व असे खोटे मेसेज व्हायरल करून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विरोधात पोलीस विभागाने कारवाही करावी या मागणीसाठी काल पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना माजी नगरसेवक संजय कनोजिया, माजी नगरसेवक श्रावण केळझरकर, कपूरचंद कनोजिया, चंद्रशेखर अरगुल्लेवार, राकेश कनोजिया, पापा कनोजिया,आदी समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.